Thursday, 26 May 2011

आणखी काही विसरलो काय ?



श्याम सूर्यवंशी
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि बाई , सर  तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
मल्हारी
हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
लहू  येण्कुरे
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा |

Tuesday, 10 May 2011

विद्यालयीन जीवनासाठी मराठी ऐवजी इंग्रजी पूर्णपणे अनैसर्गिक.


                            शाळेतील दिवस आठवतात का ?
        
   मला आठवतात ते दिवस ,  एक प्लास्टिक ची बाग त्याच्या मध्ये एक पाटी, एक पेन्सील , एक उजळणी , आणि एक फाटक्या कपड्यापासून तयार केलेले एक पाटी पुसण्यासाठी duster  , फक्त इतकेच साधन घेऊन जायचो . १०.२० ला शाळा भरायची ,
१ ली ते ४ थी पर्यंत तर खूप मजा यायची कारण गुरुजी खूप मारायचे आणि ज्याचे चुकले त्याला नाक धरून मारायला  सांगायचे . जर नाक धरून  मारायचे चुकले कि छडी आणण्यास पाठवायचे . .मग थोड्या वेळात इंटरवेल होयचा मग हीच प्रक्रिया रोज होयाची . पण आता काहीच समजत नाही पहिले जी शाळा व्हायची आणि ती मजा यायची आजच्या मुलांना येत नाही कारण ....आता हस्तकला चे क्लास होत नाहीत , कब्बडी होत नाही , खो खो नाही , फक्त एकाच वेंड शिक्षकाच्या आणि मुलांच्या डोक्यात क्रिकेट | 
          मला सांगा क्रिकेट किती जन खेळू शकतात १० ते १२ जन आणि एका वर्गात किती मुल असतात ४० ते ५० किंवा ५० ते ६० जर बारा खेळाडू बाजूला निघाले आणि उरलेले शिल्लक मुल काय करायचे ? 
           आणखी दुसरी गोष्ट आता पाहिलेच्या सारखी कविता येत नाहीत नुसते इंग्रजी चा विचार त्या लोकांच्या डोक्यात घालत आहेत . पण लक्षात असू द्या कि अगोदर मराठी च्या माघे लागा नंतर त्या इंग्रजीच्या . आपल्या जर एखाद्या लहान मुलाला विचारले कि एखादी मराठी चे पुस्तक वाचून दाखव तर म्हणतो मला येत नाही . याचा विचार करायला  हवाय .
                                                                                                                                 कुटमुलगे मल्हारी 
                                                                                                                                  ० ९०३२० ९५१३६